नगर दर्शन (वृत्तसेवा):- संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची साकुर व संगमनेर या ठिकाणी कॉलेजला येण्या जाण्यासाठी गैरसोय होत असून, मांडवे बुद्रुक या ठिकाणावरून बस सुरू करावी असं निवेदन संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांना भाजप जिल्हा कायदा सेल संयोजकचे एडवोकेट अमित धुळगंड, तसेच अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रौफ शेख. यांनी दिले आहे.
यावेळी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष दत्तू बर्डे, मांडवे बुद्रुक सोसायटीचे संचालक साहेबराव डोलनर, ज्येष्ठ नेते आप्पाजी पाटील खेमनर, देवराम पाटील धुळगंड, माऊली सूर्यवंशी, अतुल बर्डे, दौलत माळी,अजय बिडकर, सलीम शेख, संतोष बिडकर, शरद बर्डे, प्रवीण बर्डे, प्रवीण पवार, बाळू घोडेकर, राहुल पवार. यांची उपस्थिती होती. तर सर्व एकलव्य ग्रुपचा सत्कार आमदार अमोल खताळ यांचे बंधू राहुल खताळ यांनी केले आहे.लवकरच महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी बस सुरू करणार असल्याचं आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी दिले आहे.
