नगर दर्शन (वृत्तसेवा):- राज्यात पावसाने अक्षरशः धूमाकूळ घातला आहे. पुढील दोन तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातही ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. तसेच संगमनेर तालुक्यात देखील सर्वदूर पाऊस पडत आहे. साकूर पठार भागात देखील दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे.
त्यातच रात्रीपासून साकूरसह, मांडवे, बिरेवाडी पठारभागात पावसाने हजेरी लावलीय. तसेच आज सकाळपासून संपूर्ण ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणामुळे काळोख निर्माण झाला असून परिसरावर मोठं संकट निर्माण झाले आहे. तसेच आज जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
