१०० कोटींहून अधिक निधीतून सावेडी–बोल्हेगाव–केडगाव–तपोवनचा सर्वांगीण विकास : डॉ. सुजय विखे पाटील

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- सावेडी, बोल्हेगाव, केडगाव आणि तपोवन या चारही उपनगरांचा शहराच्या तोडीस तोड विकास करण्यासाठी १०० कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करण्याचा ठाम संकल्प माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

तपोवन रोडवरील कार्यक्रमात बोलताना त्यांनी विकासाच्या मुद्द्यावरच जनतेसमोर जाण्याची भूमिका स्पष्ट केली. MIDC चौकात दोन फ्लायओव्हर, नवीन विळद येथे MIDC, सावेडी येथे १५ कोटींचे भव्य ग्रंथालय तसेच बोल्हेगाव पुलाजवळील रस्त्याचे काँक्रिटीकरण ही महत्त्वाची कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभाग क्र. १ मधील भाजप उमेदवार शारदाताई ढवण यांना विजयी करण्याचे आवाहन करत, आमदार संग्राम जगताप यांच्या समन्वयाने शहराच्या विकासाची घडी बसवली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योग्य पर्याय निवडून सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!