नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हार येथील कामाची डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्याकडून पाहणी

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हार परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामांची भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. डॉ. सुजयदादा विखे पाटील यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.यावेळी त्यांनी रस्त्याच्या कामाची प्रगती, ड्रेनेजच्या कामाची सद्यस्थिती तसेच कामाचा दर्जा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.

तसेच महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध अडचणी जाणून घेत त्यांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ नये आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची दक्षता घेण्यावर त्यांनी विशेष भर दिला.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!