बाभळेश्वर कार्यालयातही विचारणा करायची कोणाकडे, कार्यालयाला संपर्क करण्यास सुविधाही नाही.कर्मचारी आधिकारी रोज असतात नॉटरिचिबल.
नगर दर्शन (वृत्तसेवा):- लोणी बुद्रुक परिसरात मोठ्या प्रमाणात विजेचा लंपडाव सुरु असून एकदा खंडीत केलेला विज पुरवठा १२ तास उलटूनही बंद अवस्थेत असून महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
लोणी बुद्रुक गावठाण परिसरात शनिवारी रात्री साडेबारा वाजता विज पुरवठा खंडीत करण्यात आला असून रविवारी दुपारी चार वाजे पर्यंतही बंद अवस्थेतच असल्याने परिसरातील नागरीक त्रस्त झाले आहेत.विज वितरण कंपणीच्या कर्मचार्यांचेही दुरध्वनी संपर्क क्षेत्राच्या बाहेर किंवा संपर्क झाल्यावर कर्मचार्यांकडूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. बाभळेश्वर येथीलही कार्यालयातील कोणत्या आधिकारी किंवा कर्मचार्यांशी संपर्क होत नाही. बाभळेश्वर येथील विज वितरण कंपणीचे शासकीय कार्यालय असून देखील या कार्यालयात संपर्कासाठी दुरध्वनी उपलब्ध नसल्याने नागरीकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
लोणी सोनगाव रस्त्यावर कंपनीकडून केबल टाकण्याचे का सुरु असून या कामासाठीही दिवसभर विज खंडीत केली जाते. रात्री अपरात्री कधीही वीज प्रवाह बंद केला जात असून महावितरण कंपणीच्या मनमानी कारभाराने परिसरातील नागरीक हैरान झाल्याचे चित्र दिसत आहे.
