नगर दर्शन (वृत्तसेवा):– पाथर्डी तालुक्यातील करंजी गावात मागील दोन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच नागरिकांशी आत्मीयतेने संवाद साधून त्यांना धीर दिला. यावेळी शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीत त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास दिला.
यासोबतच, नुकसानग्रस्त नागरिकांना स्थायी आदेशानुसार तातडीने मदत देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच, घरांची पडझड झालेल्या भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे निर्देश दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद भंडारी आणि जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. सुधाकर बोराळे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
