नगर दर्शन (वृत्तसेवा):- संगमनेर मधील प्रवरा नदीपात्रामध्ये एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर घटनेची माहिती संगमनेर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित मृतदेहाचा पंचनामा करून संगणमेर शहर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 104/2025 BNSS कलम 194 प्रमाणे दि.14/09/2025 रोजी दाखल करण्यात आला आहे.
सदर मृतदेह पुरुष जातीचा असून मयताचे वय अंदाजे 45 वर्ष आहे. परंतु त्याचे नाव, गाव, व पत्ता माहीत नाही. तरी सदर बेवारस मयता बाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याला संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
संपर्क क्रमांक नं.02425/225333 किंवा पोहेकॉ योगेश हासे मोनं. 9309983906 पोहेकाॅ/ गांजवे 9922442361या नंबर वर संपर्क साधावा.
