अतिवृष्टीने बाधीत लोकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या- ना.विखे पाटील.

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरीकांना मदत उपब्लध्द करून द्यावी.मोठ्या स्वरुपात पाणी आलेल्या नागरी वस्त्यामधील लोकांच्या सहकार्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित कराव्यात आशा सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.

जिल्ह्यात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक आपतीची माहीती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडून जाणून घेतली.अतिवृष्टीने नागरीकांचे हाल होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, पाण्यामुळे धोका असलेल्या भागातील नागरीकांना सुरक्षास्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

रविवारी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने १९महसूल मंडलातील गावांना मोठ्या नैसर्गिक संकटास सामोरे जावे लागल्याची प्राथमिक माहीती समोर आली असून यामध्ये पारनेर तालुक्यातील ३,पाथर्डी तालुक्यातील ३,श्रीगोंदा तालुक्यातील ८, कर्जत तालुक्यातील ५ मंडलाचा समावेश असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.काही भागात घरांची पडझड तसेच शेती पिकांचे नूकसान झाले आहे.मात्र पूर परीस्थिती ओसल्यानंतर नूकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल.सध्या तरी नागरीकांना शासन स्तरावरून मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यास प्रशासनाला सांगण्यात आले असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

अतिवृष्टीने पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे विविध ठिकाणी अडकलेल्या १५लोकांची तसेच कासारपिंपळगाव येथील १६लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून, सर्व रहीवाशांचे स्थलांतर करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.

कर्जत तालुक्यातील करपडी येथे एका घराला तलावाच्या पाण्याने वेढा दिला या कुटंबातील ५व्यक्तिंना बोटीच्या साह्याने बाहेर काढण्यात आले आहे. नैसर्गिक संकटाने नूकसान झालेल्या रहीवाशांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या असून, पुढील दोन दिवस जिल्ह्याला हवामान विभागाने अति पावसाचा दिलेला इशारा विचारात घेवून उपाय योजना करण्याबाबतही सतर्कतेने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!