Sharad Pawar On Gopichand Padalkar : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेच्या संदर्भात शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी अशी गलीच्छ टीका करणं योग्य नाही, असं शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सुनावलं. तसेच गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आहे, असंही शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करुन सांगितले.







