राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील शांतीनगरमध्ये धाडसी चोरी

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील शांतीनगर परिसरात मध्यरात्री धाडसी चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मध्यरात्री अंदाजे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे.

शांतीनगरमधील वैदुवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घर फोडून सुमारे अडीच ते तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच लोणी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून तपास सुरू करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे.

या घटनेमुळे शांतीनगर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी अधिक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!