बाललैंगिक अत्याचार प्रकरणात शहाबाज सय्यद यास वीस वर्षाची शिक्षा

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला कामासाठी घरात आणून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी शहाबाज रियाजउद्दीन सय्यद याला राहाता येथील विशेष न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राहाता तालुक्यातील एका पीडित अल्पवयीन मुलीला कामासाठी घरात ठेवून आरोपी शहाबाज सय्यद याने तिच्यावर अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. हा प्रकार मार्च २०२२ दरम्यान घडला होता.

या घटनेनंतर पीडितेने राहाता पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ (२) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा (POCSO) कलम ४ व ६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणात पीडिता, वैद्यकीय अधिकारी, पंच साक्षीदार तसेच तपासी अधिकारी यांसह १४ साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील यांनी पुरावे सादर केले. तसेच पीडितेच्या वतीने अ‍ॅड. जावेद आसाराम लोशी व अ‍ॅड. कैलास पेडळकर यांनी सहाय्य केले.

सर्व पुरावे व युक्तिवाद विचारात घेऊन राहाता येथील विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एस. पाटील यांनी आरोपी शहाबाज रियाजउद्दीन सय्यद याला दोषी ठरवत २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.या निकालामुळे अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात कठोर कारवाईचा संदेश समाजात गेला असून पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!