नगर दर्शन (वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथील शांतीनगर वैदुवाडी परिसरातील रहिवासी विनोद रमेश लोखंडे यांचे अल्पशा आजाराने अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे.
विनोद लोखंडे यांच्या निधनाने शांतीनगर वैदुवाडी परिसरात शोककळा पसरली असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.





