राहाता तालुक्यात पाऊस शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या राहाता तालुक्यात अखेर पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील विविध भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. पावसाअभावी शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अखेर झालेल्या पावसामुळे शेतजमिनींना ओलावा मिळाला असून खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील अनेक भागांत रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र दिसून आले. शेतकरी वर्गाने या पावसाचे स्वागत करत आगामी काळात समाधानकारक पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसांतही पावसाची शक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. पावसामुळे खरीप हंगामाला सुरुवात होणार असून शेतीच्या कामांना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!