नगर दर्शन (वृत्तसेवा):- संगमनेर तालुक्यातील साकुर येथील ओंकार हॉटेल पासून बनवस्ती कडे जाण्यासाठी, पावसाळ्यामध्ये शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठी गैरसोय होत असून याकडे त्वरित प्रशासनाने लक्ष देऊन रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी बन वस्ती व मांग मळई येथील नागरिकांनी केली आहे.
हॉटेल ओंकार पासून सुरू होत असलेला रस्ता बनवस्ती, मांग मळई, वाघदरा तसेच पारनेर तालुक्यातील देसवडे, बोरमळा, टेकडवाडी, पोखरी या ठिकाणी जात असतो. संगमनेर व पारनेर तालुक्याला जोडणारा हा रस्ता असल्यामुळे रहदारी खूप मोठ्या प्रमाणात असते.तर पावसाळ्यामध्ये अक्षरशः ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन चालावा लागतो. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित या रस्त्याचे काम करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.
