Minatai Thackeray: मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणी एकाला अटक

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज पहाटे रंग फेकण्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचे नाव समोर आले आहे. 

मीनाताई ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी अ उद्धव ठाकरे यांच्या मातोत्री आहेत. त्यामुळे शिवसैनिक त्यांना आदराने माँ साहेब म्हणतात. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते. आता या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पावसकर याने केला आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!