Pune Crime News: मध्यरात्री घायवळ टोळीकडून भररस्त्यात फायरींग, एक गंभीर जखमी
नगर दर्शन वृत्तसेवा:- पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. नुकत्याच नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात १९ वर्षीय आयुष कोमकरची निर्दयपणे हत्या (Pune Crime News) करण्यात आली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने आयुषवर गोळीबार केला होता. तब्बल १२ गोळ्या झाडल्या गेल्या असून, त्यापैकी नऊ गोळ्या आयुषला लागल्याने त्याचा जागीच मृत्यू (Pune Crime News) झाला होता. आयुष हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा असल्याने टोळीने सूड उगवला होता. ही घटना अद्याप ताजी असतानाच पुण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा प्रकार घडला आहे. मध्यरात्री कोथरूड परिसरात झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या टोळीकडून हा गोळीबार केला असल्याची माहिती आहे. गाडीला पुढे जाण्यास साईड न दिल्याच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितलं जातंय (Pune Crime News)







