Attack On Nashik Journalist/Crime News: नाशिक जिल्ह्यात पत्रकारांवर हल्ला झाला आहे.या हल्ल्यात अनेक पत्रकार जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या पत्रकारांवर रूग्णालयात उपचार केले जात आहेत. त्र्यंब्यकेश्वरयेथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना तेथील काही गुंडांनी बेदम मारहाणकेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्या ठिकाणी नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.
त्र्यंब्यकेश्वर येथे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर मोठा हल्ला करण्यात आला आहे. तेथील गुंडांच्या टोळक्याने पत्रकारांवर हल्ला केला आहे. यात अनेक पत्रकार जखमी झाले आहेत. इथे काही गुंड अवैध पद्धतीने प्रवेश पावती देत पैसे उकळत होते. त्याचवेळेस हा प्रकार घडला आहे. या हल्ल्याचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे.
या गुंडांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्रकारांवर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान या हल्ल्याचा पत्रकार संघटनांनी निषेध केला आहे.
दरम्यान या घटनेची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिले आहेत. तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जखमी झालेल्या पत्रकारांची भेट घेतली. छगन भुजबळ यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे







