Sangamner News : मांडवे बुद्रुक सोसायटीच्या चेअरमन पदी लहानभाऊ धुळगंड तर व्हा.चेअरमन पदी मीराबाई डोलनर यांची निवड

SHARE:

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी लहान भाऊ ठकाजी धुळगंड, तर व्हा. चेअरमन पदी मीराबाई मारुती डोलनर यांची निवड करण्यात आली आहे.संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य स्व.लक्ष्मण पाटील धुळगंड व स्व. खंडू गिरजू धुळगंड यांच्या कृपाशीर्वादाने.

       महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, तसेच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली आणि संगमनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव पाटील खेमनर, सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत पाटील खेमनर, तसेच कारखान्याचे,संचालक प्राध्यापक रामदास धुळगंड सर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वासू सहकारी लहान भाऊ ठकाजी धुळगंड यांची सोसायटीच्या चेअरमन पदी निवड निवड करण्यात आली आहे. तर लहान भाऊ धुळगंड यांच्यावरती तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे, यावेळी लहान भाऊ धुळगंड यांना संगमनेर या ठिकाणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलवून त्यांचा सत्कार केला आहे. तर ही निवड सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक प्राध्यापक रामदास धुळगंड सर यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवे बुद्रुक या ठिकाणी पार पडली आहे.
           यावेळी चेअरमन रुपेश धुळगंड. मा. चेअरमन रंगनाथ पाटील धुळगंड, मा. सरपंच भाऊसाहेब डोलनर, भीमराज बाचकर, सोसायटीचे संचालक राजेंद्र गबाजी पाटील धुळगंड, व्हा. चेअरमन कासम सय्यद, मा. चेअरमन चिमाजी रामा धुळगंड, बबन शेख, बबन भोसले, इंदुबाई शिवलाल बाचकर, बबन गायकवाड, म्हतारबा सोडणर, बाबुराव झिटे,बापू धुळगंड, साहेबराव डोलनर तसेच सर्व संचालक मंडळ, सभासद आणि मांडवे बुद्रुक ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. लहान भाऊ धुळगंड हे एक उच्चशिक्षित असून, एक संघर्षशील व्यक्तिमत्व कोणाच्याही सुखदुःखात नेहमी सहभागी असणारे युवकांपासून प्रौढांपर्यंत नेहमीच संपर्क ठेवणारे राजकारणा व्यतिरिक्त समाजकारणाला महत्त्व देणारे जात-पात न पाहता, सर्वांना सोबत घेऊन जाणारे लहान भाऊ धुळगंड आज महाराष्ट्रात अग्रगण्य समजले जाणारे अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेचे इजीनरींग कॉलेज येथे कार्यरत आहे. सोसायटीचा कारभार चांगल्या प्रकारे चालणार आहे, कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक त्या ठिकाणी होणार नसून योग्य तो न्याय या सोसायटी मार्फत देण्यात येईल असं चेअरमन लहान भाऊ ठकाजी धुळगंड यांनी म्हटले आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!