Ahilyanagar heavy rain : राहाता तालुक्यात मुसळधार पाऊस मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

SHARE:

shirdi heavy rain : राहाता तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या मोठ्या स्वरुपातील पावसाने बाधीत झालेल्या गावांना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेटी देवून नागरीकांना दिलासा दिला.अतिक्रमणामुळे बंद झालेले पाण्याचे मार्ग तातडीने खुले करून देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

राहाता तालुक्यात एका रात्रीत २००मि.मि पावसाची नोंद झाली.शनिवारी संध्याकाळ पासून सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळ पर्यत सुरू राहील्याने ग्रामीण आणि शहरी भागात पावसाच्या पाण्याने थैमान घातले.रात्री उशिरा पावसाचे प्रमाण वाढत गेले त्यानूसार गावातील शेतात नागरी वस्तीत पुराच्या पाण्याने थैमान घातले.

रात्री पासून पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यातील परीस्थीतीवर लक्ष ठेवून उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या.

लोणी राहाता कोल्हार पाथरे या गावात ठिकठिकाणी पाणी निर्माण झालेल्या नैसर्गिक परीस्थितीची पाहाणी करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना बरोबर घेवून ठिकठिकाणी पाहाणी केली.कोल्हार येथे पाणी असलेल्या भागातील नागरीकांना स्थलांतरीत करण्यासाठी एनडीआरएफचे पथक बोलविण्यात आले.प्रशासनाने बोट उपलब्ध करून दिल्या.स्थानिक युवक कार्यकर्त्यांनी पाण्यात अडकलेल्या कुटंबांना मदत करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

कोल्हार येथे पाणी जाण्यासाठी असलेल्या नालीवरील अतिक्रमणा मुळेच पाणी जागीच साठून राहील्याचे निदर्शानास आले.त्यामुळे पाण्याचा फुगवटा तयार झाल्याने सर्व पाणी बाजूच्या शेतात आणि नागरी वस्तीत शिरले.आलेला अनुभव विचारात घेवून तातडीने पाण्याचे प्रवाह अतिक्रम मुक्त करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी प्रांताधिकारी माणिक आहेर सार्वजनीक बांधकाम विभागाचे अभियंता गुंजाळ तसेच जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांना दिल्या.

मंत्री विखे पाटील यांनी कोल्हार येथे स्वताच्या देखरेखी खाली जेसीबी लावून चर खोदण्याचे काम सुरू केले.त्यामुळे कोल्हार राजूरी मार्गावर साचलेल्या पाण्याचा विसर्ग होवू शकला.

लोणी बुद्रुक गावातील परीस्थीतीचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी ग्रामस्था समवेत चर्चा करून उपाय योजना केल्या आवश्यकता तिथे जेसीबी त्यांनी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.पाथरे येथेही मंत्री विखे पाटील यांनी भेट देवून ग्रामस्थांना दिलासा दिला.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!