कायदा हातात घेऊन सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई – ना. विखे पाटील

SHARE:

Ahilyanagar News : अहील्यानगर शहरात घडलेल्या घटनेबाबत पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई केली आहे.मात्र कोणी कायदा हातात घेवून सामाजिक शांतता बिघविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिल्या असल्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.कोणत्याही आफवांवर विश्वास न ठेवता जिल्ह्यात शांतता राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

अहील्यानगर शहरातील घटनेबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांशी आपण संपर्क केला असून,त्यांनी संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केल्याचे सांगितले आहे.पोलीसांनी सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण केल्यानंतरही काही लोकांनी जाणीवपुर्वक पोलीस प्रशासानास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला.आंदोलन करण्याचा अधिकार सर्वाना आहे.परंतू या घटनेचा गैरफायदा घेवून धार्मिक सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणे योग्य नाही.कायदा हातात घेवून सामाजिक शांतता बिघविण्याचा प्रयत्न कोणी करीत असेल तर पोलीस प्रशासनही शांत बसण्याची भूमिका घेणार नसल्याचे मंत्री विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

जिल्ह्याची सामाजिक शांतता टिकवून ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे.समाजामध्ये धार्मिक सामाजिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य आणि कृती टाळता आली पाहीजे..अहील्यानगर जिल्ह्याच्या शांततेला गालबोट लाण्याचा प्रयत्न होत असेल तर पोलीसांची कारवाई होणारच.

आपला जिल्हा मोठ्या नैसर्गिक संकटाला सामोरा जात आहे.दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!