दिवाळीपूर्वी नुकसानग्रात शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत वर्ग होण्यास सुरवात – मंत्री विखे पाटील

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- जिल्ह्यात सप्टेंबर महीन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नूकसानीपोटी ८ लाख २७ हजार ११८ शेतक-यांना ८४६ कोटी ९६ लाख रूपयांची मदत महायुती सरकारने जाहीर केली असून, दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या असल्याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यातील काही भागात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नूकसान झाले. यामध्ये जिल्हयातील ६० लाख हेक्टर क्षेत्राचे या नैसर्गिक आपत्‍तीमुळे नूकसान झाले होते. या सर्व भागाची पाहाणी करून झालेल्या नूकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना महसूल तसेच कृषी विभागाला दिल्या होत्या. त्यानूसार जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतक-यांच्या झालेल्या नूकसानीची आकडेवारी आणि मदतीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता.

राज्यातील अन्यही जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची परीस्थिती विचारात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीत ३ हजार २५८ कोटी ५६ लाख रुपयांच्या मदतीचा निर्णय घेवून दिवाळी पुर्वी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याचे आश्वासन दिले होते. शासन निर्णयानूसार अहिल्‍यानगर जिल्ह्याला ८६४ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून याचा लाभ जिल्ह्यातील ८ लाख २७ हजार ११८ शेतक-यांना मिळेल असे मंत्री विखे पाटील म्हणाले.

मदतीचा निधी वर्ग करताना शासन नियम आणि निकषांचे पालन करण्याच्या तसेच नैसर्गिक आपत्‍ती करीता असलेल्या अटी व शर्तीची पूर्तता तसेच लाभारथीची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!