लोणी पोलीस ॲक्शन मोडमध्ये : अवैध धंदे व ट्रॅफिक नियमभंगावर धडक

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी ब परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर आज लोणी पोलिसांनी ठोस व प्रभावी कारवाई केली. दारूबंदी कायद्याच्या अंमलबजावणी अंतर्गत संशयित ठिकाणी छापे (रेड) टाकून दारूबंदी कायद्यानुसार दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

याचबरोबर लोणी येथे विशेष नाकाबंदी व वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या तपासणीदरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. विना नंबर प्लेट वाहने, चारचाकी वाहनांना अनधिकृत काळी काच (ब्लॅक फिल्म), कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट मोटारसायकलींचे सायलेन्सर अशा विविध प्रकारच्या नियमभंगाच्या एकूण २२ केसेस करण्यात आल्या.

या सर्व कारवाईतून दोषी वाहनचालकांकडून एकूण १७ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक सुरक्षितता, नागरिकांचा त्रास कमी करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे , अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (शिर्डी उपविभाग) अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर कारवाईत लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे, हवालदार सोमनाथ गाडेकर, हवालदार कल्याण काळे, पोलीस नाईक रवींद्र मेढे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश सातपुते व पोलीस कॉन्स्टेबल नऱ्हे यांनी सक्रिय सहभाग घेतला.

अवैध दारू व्यवसाय, बेकायदेशीर वाहने व वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा लोणी पोलिसांनी दिला आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!