“लोणी बुद्रुक येथील अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवास सुरुवात”

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ४६ व्या पुण्यतिथीनिमित्त प्रवरा परिवाराच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर लोणी बुद्रुक येथे सात दिवसांच्या अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सवाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करून झाली. धार्मिक वातावरणात गाथा पूजनही करण्यात आले.कारखाना कार्यस्थळावरील स्मृतिस्थळावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सभापती ज्ञानेश्वर गोंदकर यांच्यासह प्रवरा उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याचबरोबर पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९४ व्या जयंतीचे औचित्य साधून लोणी ग्रामस्थांच्या वतीने यंदा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.सप्ताहाचा शुभारंभ माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, शालिनीताई विखे पाटील आणि धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने घटस्थापना व गाथा पूजन करून करण्यात आला. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा सप्ताह मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!