संगमनेर शहर पोलीसांकडून अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- संगमनेर शहर पोलीसांकडून अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याचे आवाहनहद्दीत आकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक 43/2026 अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित इसमाचे अंदाजे वय 25 वर्ष असून त्याने अंगात पांढरा पट्टे असलेला शर्ट व काळी पॅन्ट परिधान केलेली होती.

सदर इसम संगमनेर शहरातील वेल्हाळे शिवार परिसरात आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत बेवारस स्थितीत आढळून आला आहे. त्यामुळे या इसमाची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.सदर इसम कोणाच्या ओळखीचा असल्यास तात्काळ संगमनेर शहर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

📞 संपर्क क्रमांक :

संगमनेर शहर पोलीस स्टेशन – 02425 225333

पोलीस निरीक्षक श्री. बारवकर – 9404770800

पोहकॉ गांजवे – 9922442361

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!