सेवानिवृत्त सिव्हिल सर्जन डॅा सुरेश जगदाळे यांना दादासाहेब फाळके २०२५ चा पुरस्कार प्रदान

SHARE:

सरस्वतीबाई दादासाहेब फाळके पुरस्कार २०२५ “स्मृती सन्मानचिन्ह” देऊन मुंबई येथील आयोजीत कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी मा.दुष्यंतकुमार गौतमजी यांच्या हस्ते देण्यात आला.

नगर दर्शन (वृत्तसेवा):- सामान्य शेतकरी कुटुंबातून, बिदालच्या मातृभूमीतून सुसंकृतपणाचे आदर्श संस्कार व बिदालमध्येच पायाभूत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेऊन शासकिय वैद्यकिय महाविद्यालय मिरज येथे एम्.बी.बी.एस्. व एम्. एस्.( जन.सर्जरी)चे उच्च शिक्षण घेतले.सामान्य कुटुंबातील व बिदालच्या ग्रामीण भागातील शिकवण व संस्कारातून वाढलेल्या डॅा सुरेश यांनी सर्वसामान्य जनतेची आरोग्य सेवा करण्याचा निश्चय करून खाजगी व्यवसायाकडे न जाता महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागात १८८३ साली सेवा स्वीकारली.

नाशिक जिल्ह्यातील अतिशय दुर्गम अशा आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे माध्यमातून तेथील आदिवासी जनतेस डोंगरदर्यांत जावून आरोग्य सेवा दिल्या.याची विशेष दखल घेऊन शासनाने त्यांना एम्.एस्.या उच्च शिक्षणासाठी शासकिय खर्चाने पाठविले.अत्यंत कुशल सर्जन म्हणून त्यांनी कोल्हापूर व सातारा येथील शासकिय जिल्हा रुग्णालयाचे माध्यमातून १४ वर्षे शेकडो मोठमोठी ॲापरेशन्स करून सर्वसामान्य जनतेची उत्कृष्टपणे रूग्णसेवा केली.

त्यानंतर शासनाने त्यांना सिव्हील सर्जन म्हणून पदोन्नती सातारा येथे दिली.त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली ( २००९ ते २०१५).या त्यांचे कार्यकाळात सिव्हील हॅास्पिटल सातारा व जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रूग्णालयांमध्ये गुणवत्तावर्धक अनेक सेवा सुविधा सर्वसामान्य जनतेसाऱ्ठी देवून मोठे समाजकार्य केले व सिव्हील हॅास्पिटलला *राज्यातील सर्वोत्कृष्ट रुग्णालयाचा* दर्जा प्राप्त करून देऊन प्रथम क्रमांकाचे ५० लाखाचे पारितोषकही मिळवून दिले.

त्यानंतर त्यांना त्यांचे सेवाकाळाच्या उत्तरार्धात नाशिक जिल्ह्यातही सिव्हील सर्जन म्हणून ६वर्षे सेवा करणेची संधी मिळाली, तेथे त्यांनी उत्कृष्टपणे त्या जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी मोठे सेवाभावी कार्य केले. तेथेही आपल्या कार्याचा ठसा उमटविला.

राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाचे माध्यमातून १८ वर्षाचे आतील ज्या मुलांना जन्मजात ह्रदयदोष होते अशा शेकडो बालकांच्या ह्रदयशस्रक्रिया मोफत करून दिल्या.हजारो वयाोवृध्दांच्या मोतीबिंदूच्या मोफत शस्रकिया करून त्यांना दृष्टीदान दिले.सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी ग्रामीण भागात जावून तज्ञ डॅाक्टराच्या मोफत सेवा दिल्या तसेच जिल्ह्यातील ३२ ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालयांचे माध्यमांतून सर्वसामान्य जनतेसाठी गुणवत्तावर्घक आरोग्य सेवा दिल्या आहेत.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!