नगर दर्शन (वृत्तसेवा):- लोणी येथील कान्होबा चारी पाथरे रोड येथील रहिवासी रमेश जगन्नाथ विखे यांच्या घराचे कुलूप डुप्लिकेट चावून उघडून त्यांच्या घरातील साठ हजार किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद रमेश विखे यांनी लोणी पोलीस ठाण्यात दिली होती. सदर घटनेचा लोणी पोलीस ठाण्यात भ.द.वी. कलम ३०५(अ),३३१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचा तपास लोणी पोलीस करत असताना त्यांच्या असे निदर्शनात आले की फिर्यादी यांच्या घराशेजारील राहणारा भाडेकरू अक्षय सुरेश गायकवाड मूळ राहणार शिर्डी याने फिर्यादीच्या राहते घराच्या कुलपाची चावी डुबलीकेट बनवून फिर्यादी यांच्या घरातील साठ किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीला पोलीस ही खाके दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.आरोपीकडून सुमारे 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीवर यापूर्वी लोणी पोलीस स्टेशनला ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सोमनाथ गाडेकर, अमोल जाधव, निलेश सातपुते यांनी केला.







