वैदू समाज प्रीमियर लीग (लोणी) स्पर्धेला आजपासून सुरुवात

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी (वैदूवाडी) येथे म्हसोबा महाराज क्रिकेट क्लब यांच्या वतीने वैदू समाज प्रीमियर लीग (लोणी) या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दि. १६ मे ते रविवार दि. १७ मे २०२६ दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.या स्पर्धेत वैदू समाजातील महाराष्ट्रातील अनेक संघ सहभागी होत असून परिसरातील क्रिकेटप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. स्पर्धेसाठी विजेत्या संघांना आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली असून प्रथम बक्षीस ₹५१,०००, द्वितीय ₹३१,०७७, तृतीय ₹२१,००० आणि चतुर्थ ₹११,००० असे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी विविध मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि आयोजक मंडळींचे सहकार्य लाभले असून, स्थानिक युवकांनी मोठ्या प्रमाणावर आयोजनाची जबाबदारी स्वीकारली आहे. स्पर्धेमुळे परिसरातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार असून सामाजिक एकोपा आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार आहे.

स्पर्धेचे सामने बी.पी.एड. कॉलेज मैदान (गणपती मंदिर), सादतपूर रोड, लोणी येथे खेळविण्यात येणार असून सर्व क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!