कोल्हार भगवतीपुर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने नगर मनमाड राज्यमार्गावर तीव्र आंदोलन

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा) :- कोल्हार भगवतीपुर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने स्व.अनिकेत सोमनाथ वडीतके याची सोशल मीडियावर बदनामी करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या गोरक्षकांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन शिर्डी चे डी वाय एस पी अमोल भारती व राहाता चे तहसीलदार अमोल मोरे यांच्याकडे देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. 

 आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नगर मनमाड राज्य मार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पा. अनिकेत वडीतके यांना भरीव मदत करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे व वडीतके कुटुंबीयांना न्याय द्यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आले.    

         येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणा देत अनिकेत वडीतके यास न्याय मिळालाच पाहिजे , दोषींवर फाशीची शिक्षा सुनवण्यात यावी . नगर मनमाड राज्य मार्गावरून ठिय्या मांडून आंदोलन छेडण्यात आले.

       यावेळी सकल धनगर समाज ज्याचे संघर्ष द्या दीपक बोराडे यशवंत सेना चे जिल्हाप्रमुख विजय तमनर , रा. स. प. चे सरचिटणीस डॉक्टर सुनील चिंधे, सरपंच शिवाजी शिंदे ,दत्तात्रय माळी, संजय कुदनर, पांडुरंग आठरे माऊली वडीतके, समस्त कडीत मांडवे फत्याबाद गळनिंब पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!