लाल किल्ला स्फोटानंतर पोलीसांची सर्वात मोठी कारवाई, एक संशयित ताब्यात

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- राजधानी दिल्ली भीषण बॉम्बस्पोटाने हादरली आहे. लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटाचा तपास सुरु असताना पोलीसांना सर्वात मोठं यश मिळाले आहे. एक संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

राजधानी दिल्ली भीषण बॉम्बस्पोटाने हादरली आहे. लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला आहे. मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ झालेल्या या स्फोटात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटानंतर शेजारील दोन ते तीन इतर वाहनांनी पेट घेतला. या आगीत तीन ते चार वाहने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. अशातच आता या स्फोटाचा तपास सुरु असताना पोलीसांना सर्वात मोठं यश मिळाले आहे. एक संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

दिल्ली पोलीसांच्या सुत्रांनी हा हल्ला नियोजित कट असून दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवला आहे. अशातच आता स्फोटाच्या वेळी कारमध्ये असलेल्या एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला गंभीर अवस्थेत एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची चौकशी सुरु करण्यात येणार आहे. यातून मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!