लोणी कॉलेज रोडवर छेडछाड प्रकरणी ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल एक आरोपी अटकेत

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):-  लोणी परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी घटना 24 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास घडली. लोणी कॉलेज रोडवरून जात असलेल्या 24 वर्षीय युवतीला तीन अनोळखी इसमांनी अश्लील इशारे करत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला.या घटनेनंतर पीडितेने लोणी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 161/26 अंतर्गत BNS कलम 78, 79, 351(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा शोध घेतला असता, अबूजर अल्ताफ शेख (वय 21, रा. हसनापूर, ता. राहाता) याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले आहे.घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणात पुढे अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट अंतर्गतही कलमांची भर करण्यात आली आहे, ज्यामुळे आरोपीवरील कारवाई अधिक कठोर करण्यात आली आहे.

तपासादरम्यान या प्रकरणात आणखी दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग उघडकीस आला असून, त्यांच्या विरोधातही कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास SDPO शिर्डी उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत असून, महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!