गोवंश हत्या व वाहतूक करणाऱ्यांवर प्रवेशबंदी व हद्दपारीची कारवाई

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोणी पोलीस ठाण्याने गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलत मोठी कारवाई केली आहे. गोवंश हत्या, गोमांस विक्री तसेच अवैध वाहतूक करणाऱ्यांविरोधात एकूण ३३ जणांवर प्रवेशबंदी (BNSS १६३) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, २८ सराईत गुन्हेगारांवर BNSS १२६ नुसार सदर कारवाई करण्यात आली आहे.

तसेच गोहत्या आणि गोवंश वाहतूक करणाऱ्या २१ आरोपींना २१ मे ते ३० मे २०२६ या कालावधीत १० दिवसांसाठी लोणी पोलीस ठाणे हद्दीतून व श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतून प्रवेश बंदी करण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर मोहिमेत लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी, पोहेकॉ अविनाश मकासरे, पोहेकॉ साईनाथ राशिनकर, पोहेकॉ असीर सय्यद , पो.कॉ. अमोल फटांगरे, पो.कॉ.रवींद्र माळी, चालक बाळकृष्ण वर्पे,मपोकॉ गिरी यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वी केली.लोणी पोलिसांच्या या धडक कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून, गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!