लोणी येथील दीपक धनवटे यांची API पदावर पदोन्नती

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- राहाता तालुक्यातील लोणी येथील दीपक दत्तात्रय धनवते (वय ४०) यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर पदोन्नती झाल्याने लोणी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दीपक धनवटे यांनी सन २०१५ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर नियुक्ती मिळवली होती. त्यानंतर त्यांनी ठाणे, पालघर आणि धुळे येथे प्रामाणिकपणे सेवा बजावली. तब्बल ११ वर्षांच्या सेवेनंतर वरिष्ठतेनुसार त्यांची नाशिक परिक्षेत्र विभागात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर पदोन्नती झाली आहे.

शैक्षणिकदृष्ट्या देखील दीपक धनवटे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यांनी B.Com, M.Com आणि B.P.Ed. अशी पदवी प्राप्त केली आहे. विशेष म्हणजे केवळ २७ व्या वर्षी त्यांनी PSI पद मिळवून आपल्या मेहनतीची आणि जिद्दीची छाप उमटवली.

त्यांच्या या यशाबद्दल लोणी ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या यशामुळे परिसरातील तरुणांना प्रेरणा मिळत असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते आदर्श ठरत आहेत.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!