अमित शाह यांची विखे पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रे’चा पूजित जलकलश केंद्रीय मंत्री अमित शाह यांना सुपूर्त केला.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीदरम्यान मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोदा ते नर्मदा जलयात्रेची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक Ahilyabai Holkar यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षानिमित्त या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जलसंवर्धन, जलसंरक्षण आणि जलसाक्षरतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांतील आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने ही यात्रा महत्त्वपूर्ण ठरल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील तीस नदीखोऱ्यांतील जलकलशांचे यात्रेनिमित्त पूजन करण्यात आले. मध्य प्रदेशातील Maheshwar येथे मुख्यमंत्री Mohan Yadav यांच्या उपस्थितीत झालेल्या समारोप कार्यक्रमाची माहितीही मंत्री विखे पाटील यांनी अमित शाह यांना दिली. याच वेळी पूजित जलकलश त्यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

भेटीदरम्यान राज्यातील राजकीय, सामाजिक तसेच नागरी विषयांवरही सविस्तर चर्चा झाली. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मंत्री विखे पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व विकासाभिमुख कार्याचे कौतुक केले.

दरम्यान, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी अनावश्यक खर्च टाळून गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य संकलित केले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या श्रीमती गंगूबाई विखे पाटील सभागृहात मोठ्या प्रमाणावर वह्या, पुस्तके, दप्तर, संगणक, डिजिटल बोर्ड आणि इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

तसेच बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी कृषीविषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पायरेन्स संस्थेच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रवरा उद्योग समूहातील विविध संस्थांनीही सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!