नगर दर्शन (वृत्तसेवा):- अहिल्यानगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हार–बाभळेश्वर दरम्यान ग्रीन पार्क हॉटेलसमोर सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका ८५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब किसन देठे (वय ८५, रा. कुरणपूर, ता. श्रीरामपूर) हे टीव्हीएस लुना दुचाकीवरून जात असताना रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात त्यांची एसटी बसशी धडक झाली. या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे API युवराज आठरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर अपघात होण्याचे कारण शोधण्याचे काम लोणी पोलीस करत आहेत. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.






