पत्रकाराला फोनवरून जीवे मारण्याची धमकी लोणी पोलिसांत गुन्हा दाखल

SHARE:

नगर दर्शन (वृत्तसेवा):- पत्रकार प्रसाद गणेश घोगरे यांना फोन करून शिवीगाळ करत खोटे गुन्हे दाखल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात असंज्ञेय गुन्ह्याची (NCR) नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद गणेश घोगरे (वय ३४, रा. लोणी खुर्द, नेहरूनगर, ता. राहाता) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ११ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.१२ ते १२.१६ वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर आरोपी मोहन आडागळे (रा. श्रीरामपूर) याने फोन केला. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या पॉक्सो प्रकरणासंदर्भात बातमी का प्रसिद्ध केली, तसेच ती मागे घ्यावी, अशी मागणी करत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

 पत्रकार म्हणून आपले कर्तव्य बजावत संबंधित बातमी प्रसिद्ध केल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा, बलात्कार तसेच मुलीच्या अपहरणासारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. तसेच फोनवर शिवीगाळ करून “तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, जिथे दिसशील तिथे जीवे मारून टाकीन,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५१(४) अन्वये एनसीआर क्रमांक ०७१३/२०२६ गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास लोणी पोलीस करत आहे.

Nagar Darshann
Author: Nagar Darshann

Leave a Comment

error: Content is protected !!