नगर दर्शन (वृत्तसेवा):- टायगर ग्रुप लोणीचे अध्यक्ष पै. आण्णा ब्राम्हणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय व अनाथ आश्रम येथे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच अन्नदानाचा कार्यक्रमही पार पडला.
या उपक्रमांतर्गत आश्रमातील सुमारे १०० विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, स्कूल बॅग आदी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना भोजन देत वाढदिवस साध्या आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून उपस्थितांनाही समाधान वाटले. टायगर ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
आश्रमाचे संचालक पप्पू सपकाळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “टायगर ग्रुपच्या माध्यमातून या आश्रमात सातत्याने सामाजिक कार्यक्रम राबविले जातात. तान्हाजी भाऊ जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांकडून आश्रमातील मुलांना नेहमीच मदतीचा हात दिला जातो, ही बाब कौतुकास्पद आहे.”
यावेळी टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष पै. बंटी भाऊ भिंगारदिवे यांनी वाढदिवस, उत्सव आणि आनंदाचे क्षण समाजातील गरजूंसोबत साजरे करण्याचे आवाहन केले. “हीच खरी समाजसेवा आहे,” असे ते म्हणाले.
या प्रसंगी सुहास ब्राम्हणे, बाळा कुटे, धनु चव्हाण, विजय साबळे, मच्छिंद्र दराडे, अनिकेत खरात, विजय भोसले, महिंद्रा खरात, वैभव शेलार, मुरली पवार, सिद्धार्थ खरात, महेश खरात, करण गायकवाड, प्रतीक सोनवणे, मयूर वाघमारे, प्रणव कादंळकर, साईजीत बोर्डे, धिरज चितळे, यश क्षिरसागर, आकाश कुऱ्हे आदींसह टायगर ग्रुपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







